आज अचानक एकाएकी..

आज अचानक एकाएकी, मानस लागे तिथे विहारु

खेड्यामधले घर कॊलारु…

पूर्व दिशेला नदी वहाते, त्यात बालपण वाहत येते

उंबरठ्या ते येवून मिळते, यॊवन लागे उगा बावरु,

खेड्यामधले घर कॊलारु…

माहेराची प्रेमळ माती, त्या मातीतुन दिसते प्रगती,

कनकावरती माणिकमोती, तिथे भिरभिरे स्मृती पाखरू,

खेड्यामधले घर कॊलारु…

आयुष्याच्या पाऊलवाटा, किती तुडविल्या येता जाता,

परि आईची आठवण होता, मनी वादळे होती सुरु,

खेड्यामधले घर कॊलारु…

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.